मोटू पतलू कार्टुनच्या गळ्यात अडकवली नितेश राणे नावाची पाटी
पुणे - भाजप आमदार नितेश राणेंनी युवासेना सचिव वरुण सरदेसाईवर आरोप केलेयावरून शिवसेना युवा सेना आणि भाजपात वाद चिघळला आहे. पुणे जिल्हा युवा सेनेच्या वतीने वाघोली येथे मोटू पतलू कार्टूनच्या गळ्यात नारायण राणे आणि नितेश राणे यांच्या नावाच्या पाट्या अडकत हातात कोबंड्या पकडून नितेश राणे, नारायण राणे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.यावेळी पुणे जिल्हा युवा सेना प्रमुख मच्छिंद्र सातव यांच्या सह युवासेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.